पुणे :
पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल, बावधन येथे दिनांक ५ जून रोजी पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी विद्यार्थ्यांनी “निसर्ग वाचवा, प्लास्टिक टाळा” हा संकल्प करत शपथ घेतली. पर्यावरण रक्षणाचा संदेश देताना विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणही केले.
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित भारताचा संदेश देण्यासाठी ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी पर्यावरणावरील भाषणे देऊन जागरूकता निर्माण केली.
या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल आणि संचालिका कु. शिवानी बांदल यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभदा कोलते यांच्या नेतृत्वाखाली समन्वयक प्राज्ञा जोशी, शिरीन काझी आणि सायली गायकवाड यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत नीटनेटका, शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने संपन्न झाला.
More Stories
बाणेरमध्ये ‘महा भोंडला आणि दांडिया ईव्हनिंग’चे आयोजन,स्त्री फाऊंडेशन आणि जयेश मुरकुटे सोशल फाऊंडेशनचा उपक्रम..
बालेवाडीत शिवम बलवडकर फाउंडेशनतर्फे भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन
सौ. पूनम विशाल विधाते (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहर व अध्यक्ष, वामा वुमेन्स क्लब) यांच्या वतीने ‘सावतामाळी महिला भजनी मंडळ, बाणेर’ यांचा सत्कार