पिरंगुट :
पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पिरंगुट येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरण संरक्षणाचा जागर करत झाडांचे महत्त्व, निसर्गरक्षणाचे मूल्य आणि शाश्वत भविष्यासाठी वृक्षारोपणाचा संदेश विद्यार्थ्यांनी विविध माध्यमांतून दिला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमापूजनाने व पर्यावरण रक्षणाच्या शपथ विधीने झाली .यानंतर विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर आधारित मूकनाट्य सादर करून निसर्गाचं महत्त्व प्रभावीपणे मांडलं. ‘झाडे लावा, झाडे जगवा व जीवन वाचवा’ या घोषणांनी संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले.
शाळेचे संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल आणि शिवानी बांदल यांच्या हस्ते वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये प्रमुख पाहुण्यांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून परिसरात विविध प्रकारची रोपे लावली. या उपक्रमातून पर्यावरण रक्षणासाठी व्यक्तिगत सहभाग किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित करण्यात आले.
अंतरा रायरीकर व हर्षदा बलकवडे या दोघींनी ‘पर्यावरण वाचवा’ या विषयावर प्रभावी भाषणे दिली. संचालिका रेखा बांदल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, “पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लहान वयातच पर्यावरणाशी नातं जोडले गेले पाहिजे तरच आपले भविष्य सुरक्षित होईल.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी पियुशा आल्हाट हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या आसावरी हंचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभागप्रमुख पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे तसेच सामवेद (ग्रीन) हाऊस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेमाची भावना रुजवणारा ठरला.



More Stories
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा