बाणेर :
बाणेर परिसरातील निसर्गाची अनमोल देणगी असलेल्या तुकाई टेकडीच्या स्वच्छतेसाठी आज एक विशेष मोहीम राबवण्यात आली. जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि BPT सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्वच्छता अभियानात बाणेर आणि परिसरातील नागरिक, तरुण मित्र-मैत्रिणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तुकाई टेकडी ही बाणेर परिसरातील एक महत्त्वाचे नैसर्गिक ठिकाण आहे, परंतु गेल्या काही काळापासून येथे वाढलेला कचरा, प्लास्टिक आणि अस्वच्छता यामुळे तिचे नैसर्गिक सौंदर्य बाधित झाले होते. या पार्श्वभूमीवर, जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि BPT सेवा यांनी ही स्वच्छता मोहीम आयोजित करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, सकाळपासूनच अनेक स्वयंसेवक तुकाई टेकडी येथे जमा झाले होते. सर्वांनी मिळून टेकडी परिसरातील कचरा गोळा करून तो स्वच्छ केला. “आपली टेकडी, आपली जबाबदारी!” या जाणिवेतून सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला, ज्यामुळे टेकडीचा परिसर पुन्हा एकदा स्वच्छ आणि सुंदर दिसू लागला.
या यशस्वी मोहिमेबद्दल जयेश मुरकुटे, कार्याध्यक्ष, कोथरूड विधानसभा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांनी सर्व उपस्थित मित्रमंडळी आणि नागरिकांचे आभार मानले. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी अशा सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी