बाणेर:
जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनने आज बाणेर वाहतूक पोलीस शाखेतील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप केले.
पावसाळ्यात आपले कर्तव्य बजावताना नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
– जयेश मुरकुटे(कार्याध्यक्ष : कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद चंद्र पवार))
यावेळी जयेश मुरकुटे यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी मित्र उपस्थित होते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाप्रती आदर आणि त्यांच्या योगदानाला पाठिंबा देण्याच्या फाउंडेशनच्या बांधिलकीचा हा एक भाग आहे.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!