बाणेर :
शिवराज्याभिषेकाच्या पवित्र दिनाचे औचित्य साधत पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सौ. पूनम विशाल विधाते यांनी यावर्षीही मुलींच्या शिक्षणासाठी ‘सेवेसमर्पणाचा संकल्प’ हा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थिनींना वर्षभरासाठी आवश्यक शालेय साहित्याचे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सौ. पूनम विशाल विधाते यांनी सांगितले की, शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या जिजाऊ-सावित्रीच्या लेकींना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, या उदात्त हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुलींच्या संपूर्ण शालेय शिक्षणाचा खर्च वर्षभरासाठी उचलणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
या सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सौ. रुपालीताई चाकणकर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार सुनील अण्णा टिंगरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, तसेच ज्येष्ठ नेते सुरेश अण्णा घुले यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
शिक्षणाला समाजसुधारणेचा सर्वात मोठा मंत्र मानत, मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यास मदत होणार आहे.
More Stories
बाणेर येथे गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित “पर्यावरणपूरक गणपती बाप्पा मूर्ती कार्यशाळा” उत्साहात संपन्न..
“बाप्पा मोरया! सर्जनशीलतेचा जयघोष” – पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गणेश मूर्ती वर्कशॉप
बालेवाडी येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून स्मार्ट मीटरच्या फायद्याबद्ल माहिती आणि पायाभूत सुविधांचे वेळेवर देखभाल करून वीजपुरवठा सुधारण्याचे आश्वासन