October 18, 2024

Samrajya Ladha

बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, म्हाळुंगे मधील नागरिकांनी अनुभवला ‘द व्हॅक्सिन वॉरचा’ थरार..

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मोफत स्क्रिनिंग

औंध :

कोविड महामारीची दहशत संपूर्ण जगाने अनुभवली. या महासंकटातून संपूर्ण मानव जातीला बाहेर काढण्याचे काम आपल्या भारतीय वैज्ञानिकांनी केले. यावर आधारित विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा कोथरुडचे विधानसभा आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड विधानसभा मतदारसंघ उत्तर (बाणेर,बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, म्हाळुंगे) द व्हॅक्सिन वॉर सिनेमाच्या मोफत आयोजन करण्यात आले होते. याचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेत व्हॉक्सिन तयार करण्याचा थरार अनुभवला.

सन २०२० पासून सलग दोन वर्षे संपूर्ण जगाने कोरोनाचं महाभयंकर रूप पाहिलं. जगभरात धुमाकूळ घातलेल्या या महामारीने सगळ्यांनाच हादरवून सोडलं होतं. एकीकडे डॉक्टर्स या विषाणूशी लढा देत असताना वैज्ञानिक मात्र या विषाणूला नष्ट करणारी लस शोधण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करत होते. याचं चित्रण ‘द व्हॅक्सिन वॉर’ या सिनेमात करण्यात आलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही या सिनेमाचं कौतुक केलं होतं.

कोविड विरुद्धचा लढा आणि यापासून मानव जातीला बाहेर काढण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांची प्रयत्नांची शर्थ सर्वांना समजावी यासाठी कोथरुडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाचे कोथरूड विधानसभा उत्तर विभाग (बाणेर,बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, म्हाळुंगे) मोफत स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, सिनेमा पाहून सद्गदित झालेल्या अनेकांनी चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानताना, हा सिनेमा शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ही दाखविण्याची विनंती केली. या आयोजनाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी साईश्री हॉस्पिटलचे विश्वस्त डॉ.गिरीश पोटे,डॉ.तृप्ती पारे यांचा लसीकरण कार्याबद्दल गौरव करण्यात आला.

यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, महाराष्ट्र राज्य ओबीसी सरचिटणीस प्रल्हाद सायकर, चिटणीस लहू बालवडकर, प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे, उत्तर विभाग अध्यक्ष सचिन पाषाणकर, संदीप बुटाला, सचिन दळवी, शरद भोते, मोरेश्वर बालवडकर, युवा मोर्चा अध्यक्ष रोहन कोकाटे, नवनाथ जाधव, अस्मिता करंदीकर, कल्याणी टोकेकर, उत्तम जाधव, नागरीक पदाधिकारी उपस्थित होते.