November 21, 2024

Samrajya Ladha

शिवम सुतार आयोजित भव्य रास दांडीया उत्सव २०२३ जल्लोषात साजरा….

सुतारवाडी :

शिवम सुतार यांच्या माध्यमातून नवरात्रोत्सव निमित्त तरुण,तरुणी, महिला भगिनी यांसाठी रास दांडिया महोत्सवाचे आयोजन केले होते. हा रास दांडिया महोत्सव मोठ्या दिमाखात व उत्साहात पार पडला. सुतारवाडी, पाषाण, सुस रोड परिसर आणि पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मनसोक्त दांडिया रास खेळण्याचा आनंद लुटला. यामध्ये थेट संगीत, दांडिया रास, लाईट शो यासह सुरक्षित वातावरणाची खात्री अशा अनोख्या संस्कृतीचा संगम नागरिकांना अनुभवायला मिळाला.

नवरात्रोत्सव निमित्त पंचक्रोशी व परिसरातील नागरिकांना आपला आनंद द्विगुणित करता यावा, यासाठी भव्य रास दांडियाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि मनसोक्त दांडिया खेळण्याचा आनंद लुटला, याचा मला मनस्वी आनंद आहे. पुढील काळातही आपण असेच सांस्कृतिक कार्यक्रम राबवत राहू. कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार : शिवम सुतार (मा. स्वीकृत नगरसेवक)

या दांडिया महोत्सवाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील तसेच पुण्यनगरीचे माजी महापौर तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपा सरचिटणीस मा. मुरलीधरजी मोहोळ, युवासेना सचिव किरण साळी, पाषाणचे माजी नगरसेवक तानाजीभाऊ निम्हण, भाजपा पुणे शहर चिटणीस लहू बालवडकर, अजयशेठ निम्हण, किरणशेठ निम्हण, सचिनशेठ दळवी, अक्षयशेठ पिसाळ, सिने – अभिनेत्री गायत्री बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.