बालेवाडी :
नुकत्याच बालेवाडीतील संस्कृती होम्स सोसायटीच्या गार्डला काही डिलिव्हरी बॉइजनी मारहाण केल्याच्या घटनेनंतर बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या सदस्यांनी तातडीने बाणेर पोलिस स्टेशन गाठून वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांची भेट घेतली. फेडरेशनच्या सदस्यांनी या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत सावंत यांना निवेदन सादर केले.
यापूर्वी पार्कलॅंड सोसायटीतही अशाच प्रकारची घटना घडली होती, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. फेडरेशनने मागणी केली आहे की पोलिसांनी या गंभीर प्रकरणांची दखल घेऊन असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी केली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घडलेल्या घटनेची माहिती सांगत आणि आश्वासन दिले की या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी पोलिस निश्चितच प्रयत्न करतील, असे त्यांनी सांगितले. यासोबतच, नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर काय काळजी घ्यावी याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, बाणेर पोलिस स्टेशन आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन लवकरच बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांसाठी पोलिस-नागरिक संवादाचे आयोजन करणार आहेत. या संवादात या विषयावर अधिक माहिती दिली जाईल, असेही सावंत साहेब यांनी नमूद केले.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!