बालेवाडी :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त बालेवाडी येथे भारतीय जनता पार्टी जनसेवा कार्यालयात शिवम बालवडकर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी बोलताना शिवम बालवडकर म्हणाले की, “त्याग, सेवा आणि न्यायप्रियतेचे महान उदाहरण असलेल्या अहिल्यादेवींच्या कार्यप्रेरणेने आपल्याला सदैव जनसेवेसाठी कार्य करण्याची ऊर्जा मिळते.”
या कार्यक्रमात उपस्थित समाजबांधव, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांना त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थितांनी ‘अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी प्रणाम!’ असे म्हणून त्यांच्या स्मृतीला आदराने वंदन केले. यावेळी अनेक मित्रपरिवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





























More Stories
तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पेरिविंकल पौडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार
“तायक्वांदोच्या मैदानात पेरिविंकलचा दबदबा; १६ पदकांची शानदार कमाई!”