June 4, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल आयोजित चित्रकला स्पर्धेचा नेत्रदीपक समारोप!

बाणेर :

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त बाणेश्वर मंदिर, बाणेर येथे भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला आणि रेखाचित्र स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लहानग्या कलाकारांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या अहिल्याबाईंच्या कार्यावरील विविधरंगी चित्रांनी उपस्थितांची मने जिंकली.

स्पर्धेत दोन गटांमध्ये विजेत्यांची निवड करण्यात आली, ज्यामध्ये लहान मुलांच्या कलागुणांचे दर्शन घडले.

स्पर्धेचे विजेते :

६ ते १२ वयोगट – विजेते:
१. लखमेश नारायणपूरे
२. भार्गवी पलनिटकर
३. शंभूराज इंगवले
४. सौरीष बोधनकर

११ ते १६ वयोगट – विजेते:
१. क्षितिजा चौहान
२. प्रथम पाटील
३. ध्रुवी निरगुडे
४. इरा देवस्थली

यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याची प्रेरणा या चिमुकल्या कलाकारांच्या माध्यमातून पुढील पिढीकडे पोहोचत आहे, हीच खरी त्यांची जयंती आहे. मुलांच्या या कलाकृतीतून अहिल्याबाईंच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.

कार्यक्रमाला कोथरूड उत्तर मंडलचे अध्यक्ष लहू बालवडकर, भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, भाजपा ओबीसी प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सायकर, माजी नगरसेविका ज्योतीताई कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, भाजपा उत्तर मंडल माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा नेते प्रकाशतात्या बालवडकर, सचिनजी दळवी, राहुल कोकाटे, मोरेश्वर बालवडकर, रोहन कोकाटे, काळूरामजी गायकवाड, उमाताई गाडगीळ, राजेंद्रजी पाडाळे, विवेक मेथा, अनिकेत चांदेरे, अभय बागल, अमोल पाटील, सोहम मुरकुटे, कौशल्य टंकसाळी, वैशालीताई कमाजदार, मोसमीताई बकोरे, प्रगतीताई मिसाळ, प्राजक्ताताई देवस्थळी, वंदनाताई सिंग, स्मिताताई डांगे, मृणालताई गायकवाड, स्नेहलताई चौगुले, जागृतीताई विचारे, सुजाताताई धनकुडे, सुरेखाताई वाबळे, विद्याताई चांदोरकर, रजनीताई शिरसाठ, रेश्माताई घाटे, बाणेश्वर देवस्थानचे संदीप वाडकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आणि सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले.