बाणेर :
जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि BPT सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तुकाई टेकडी स्वच्छता अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे. येत्या रविवार, १ जून २०२५ रोजी सकाळी ६ वाजता पॅन कार्ड क्लब रोड, बाणेर येथील तुकाई माता मंदिरापासून या स्वच्छता मोहिमेला सुरुवात होणार आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना जयेश मुरकुटे म्हणाले, “आपल्या परिसरातील तुकाई टेकडी ही निसर्गाची अनमोल देणगी आहे. दुर्दैवाने, आज अनेक ठिकाणी कचरा आणि प्लास्टिकमुळे तिची सुंदरता कमी होत आहे. त्यामुळेच, आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या टेकडीला स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा निर्धार केला आहे.”
ते पुढे म्हणाले, “या मोहिमेत केवळ कचरा साफ करणे महत्त्वाचे नाही, तर टेकडीवरील जैवविविधता वाचवणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि पुढील पिढ्यांसाठी एक स्वच्छ आणि सुंदर निसर्ग जतन करणे हे आमचे ध्येय आहे. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून यात सहभागी व्हावे, असे माझे नम्र आवाहन आहे.”
“आपली टेकडी, आपली जबाबदारी!” या भावनेतून प्रेरित होऊन, जास्तीत जास्त नागरिकांनी मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जयेश मुरकुटे यांनी केले आहे.


More Stories
पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे – ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा