बाणेर :
जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी आणि औंध परिसरातील नागरिकांसाठी ‘सिटी सायक्लोथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहर भाजपा सरचिटणीस गणेश कळमकर आणि माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सायकल चालवण्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्य आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेत परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
– गणेश कळमकर (सरचिटणीस : भाजपा पुणे शहर)
स्पर्धेची माहिती:
* दिवस आणि तारीख: मंगळवार, ३ जून २०२५
* वेळ: सकाळी ७:०० वाजता
* स्थळ: स. ह. नं. ८७, श्री गणेश मंदिरा शेजारी, गणराज चौक, बाणेर, पुणे – ४५
* प्रवेश: विनामूल्य
संपर्क:
अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी इच्छुक नागरिक ७०५७९९२४२४ / ७५१७९९२४२४ / ९०११४५११५५ / ९६८९६६५६९७ या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. तसेच, स्पर्धेच्या नोंदणीसाठी QR कोड उपलब्ध आहे.
‘सायकल चालवा, आरोग्य वाढवा!’ या संदेशासह आयोजित या सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


More Stories
पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे – ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा