औंध :
पुणे महानगरपालिका अंतर्गत औंध येथील क्षेत्रीय कार्यालयात म्हाळुंगे येथील Godrej Green Cove सोसायटी येथील नागरिकांच्या विविध समस्या आणि प्रलंबित तक्रारींच्या अनुषंगाने भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांनी सहाय्यक आयुक्त गिरीश धापकेकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
बालवडकर यांनी नागरिकांच्या समस्यांचे निवेदन लेखी स्वरूपात धापकेकर यांना सादर केले. या निवेदनात प्रामुख्याने सोसायटीतील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते आणि सुरक्षा यांसारख्या समस्यांचा उल्लेख करण्यात आला होता.
बैठकीदरम्यान बालवडकर यांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून नागरिकांच्या समस्यांची तातडीने दखल घेण्याची मागणी केली. तसेच, या समस्यांचे त्वरित निराकरण व्हावे, यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली. सहाय्यक आयुक्त गिरीश धापकेकर यांनी नागरिकांच्या समस्यांची दखल घेत, संबंधित विभागांशी तातडीने संपर्क साधून उपाययोजना सुरू करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिवम बालवडकर म्हणाले, “भाजपचा कार्यकर्ता म्हणून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा बनून काम करत राहणे, हीच आमची कार्यपद्धती आहे. नागरिकांच्या हितासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू.”



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले