March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सोमेश्वरवाडी मध्ये नवरात्री मध्ये रास गरब्याचा घेतला नागरिकांनी आनंद, सचिन दळवी मित्र परिवाराचे आयोजन…

सोमेश्वरवाडी :

दि. २१/१०/२३ रोजी श्री दूर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ सोमेश्वरवाडी येथे सचिन दळवी मित्र परिवाराच्या वतीने ग्रुप गरबा दांडिया महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या ग्रुप गरबा दांडिया महोत्सवास विविध ठिकाणांवरुन आलेल्या ग्रुपने गरबा, दांडिया सादर केला.

परिसरातील महिला ग्रामस्थांनी मोठया उत्साहात गरबा, दांडिया चा आनंद घेतला. माझ्या माध्यमातुन सोमेश्वर वाडी ग्रामस्थांना एक चांगल्या प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळाला याचे समाधान वाटते : सचिन दळवी(सरचिटणीस कोथरुड विधानसभा (उत्तर))

कार्यक्रमाला सोमेश्वर वाडी मधील महिला लहान मुले ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.