September 17, 2024

Samrajya Ladha

सोमेश्वरवाडी येथे श्री दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळात नवरात्री निमित्त सचिन दळवी मित्र परिवाराच्या वतीने ‘ग्रुप दांडीया महोत्सव २०२३’ चे आयोजन..

सोमेश्वरवाडी :

श्री दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ सोमेश्वरवाडी येथील नवरात्रोत्सव निमित्त सचिन दळवी मित्र परिवाराच्या वतीने ‘ग्रुप दांडीया महोत्सव २०२३’ चे आयोजन शनिवार दि. २१/१०/२०२३ रोजी सायं. ८ वा. श्री सोमेश्वर मंदिरासमोर, सोमेश्वरवाडी, पाषाण, पुणे येथे करण्यात आले आहे.

नवरात्र सुरु झाली की सर्वत्र गरबा दांडिया पाहण्याची व खेळण्याची आवड सर्वांमध्ये असते. म्हणून नवरात्रोत्सवा निमित्त सोमेश्वरवाडी येथे गरबा, दांडीया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महिला लहान मुले आणि परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी : सचिन दळवी(सरचिटणीस भाजपा कोथरुड विधानसभा (उत्तर)