September 17, 2024

Samrajya Ladha

पाषाण येथे पत्र्याच्या खोलीत भेसळयूक्त तूप तयार करण्याचा प्रकार, चतु:शृंगी पोलीसांनी ७०० किलो तूप केले जप्त..

पुणे :

पाषाण येथील भगवती नगर येथे पत्र्याच्या खोलीत भेसळयूक्त तूप तयार करण्याचा प्रकार चतु:शृंगी पोलीसांनी छापा टाकून पकडला.७००किलो येवढे तूप जप्त करण्यात आले आहे

सांगसिंग तेजसिंग राजपूत (वय ३८, सध्या रा. बुधवार पेठ, मूळ रा. राजस्थान) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. पत्र्याच्या शेडमध्ये तूपामध्ये खाण्याचे सोयाबीन तेल, डालडा मिक्स करुन बनावट तूप तयार करताना आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. त्या ठिकाणी ६५० किलो बनावट तूप, १३५ किलो तेल, १०५ किलो डालडा, ५४ पत्र्याचे मोकळे डबे, डबे पॅक करण्यासाठी लागणारी मशिन व झाकण असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चतु:शृंगी पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस नाईक बाबा दांगडे, इरफान मोमीन यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथक यांनी छापा टाकून सर्व माल जप्त केला. याबाबतची माहिती पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाला दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अंकुश चिंतामण, जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक रुपेश चाळके, बाबा दांगडे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, ज्ञानेश्वर मुळे, बाबू शिर्के, प्रदीप खरात आदींनी ही कामगिरी केली.