सोमेश्वरवाडी :
सोमेश्वरवाडी येथील वसंत दादा पाटील प्राथमिक विद्यालयात आज सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने इयत्ता १०वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कोथरुड विधानसभेचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि उपयुक्त डॉक्युमेंट होल्डर देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
या प्रसंगी भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडलचे माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, मुख्याध्यापिका चौधरी मॅडम, गोरखनाथ दळवी, गुलाब जोरे, सोनबा काकडे, रामभाऊ जाधव, विष्णू काकडे, ऋषिकेश आवटे आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
सचिन दळवी सोशल फाउंडेशनने आयोजित केलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारा ठरला.
More Stories
आयटी सोशल सर्कल बाणेर बालेवाडी आणि MSEB यांच्यात बाणेर-बालेवाडी येथे विद्युत सुरक्षा सुधारणांवर महत्त्वपूर्ण चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कोथरुड उत्तर मंडलच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
बाणेरच्या ओरिअन रेजेन्सी सोसायटीसमोरील पदपथाचे काम पूर्ण; नागरिकांनी समीर चांदेरे यांचे मानले आभार