बालेवाडी :
‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिए योग’ या जागतिक संकल्पनेनुसार आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुण्यातील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे भव्य योग-संगमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व अमोल बालवडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे.
कार्यक्रम शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता सुरू होणार असून, या योग महोत्सवामध्ये हजारो नागरिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
योग दिनानिमित्त उपस्थित सर्व सहभागींना मोफत टी-शर्ट व योगा मॅट देण्यात येणार आहे. कार्यक्रमामध्ये सामूहिक योगाभ्यास, विविध योगासने, तसेच योगासंबंधी प्रात्यक्षिके व मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांना QR कोड स्कॅन करून नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
More Stories
सुसगावात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन, शिवसैनिक दिलीप मुरकुटे यांचा उपक्रम…
पाषाण बाणेर परीसरातील पतसंस्थांची कामे चांगली : सुनील चांदेरे
“उत्सव नारीशक्तीचा पर्व – २” : पूनम विशाल विधाते यांच्या संकल्पनेतून मंगळागौर स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद