औंध :
माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वतीने औंध, पाषाण सोमेश्वरवाडी, सुतारवाडी या परिसरातील माता भगिनींसाठी ‘विशेष संदेशासह’ घरगुती गणपती व गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेची माहिती देताना माझी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखिल श्री गणरायाचे आगमन अगदी धडाक्यात झाले असुन मोठया आतुरतेने वाट पाहणारे नागरीक आता मोठया उत्साहात गणपती बाप्पा ची पूजा अर्चा करत आहेत. घरोघरी गौरी गणपतीची सजावट मोठया कल्पकतेने नागरीक करतात त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ‘गौरी-गणपती सजावट स्पर्धा’ आयोजित करत आहोत. आम्हाला खात्री आहे की, दरवर्षी प्रमाणे आपण यावर्षी देखील या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद द्याल व तितक्याच उत्साहाने सहभागी व्हाल. स्पर्धेतील विजेत्यांना खालीलप्रमाणे आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे, त्यासोबतच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देखील दिल्या जाणार आहेत.
नागरीकांना विनंती आहे की, आपले सण आपणास पर्यावरणीय नातेसंबंध महिला सक्षमीकरणासह अनेक सामाजिक व शास्त्रीय संदेश देत असतात अशा विशेष संदेशासह गौरी गणपती सजावट फोटो किंवा व्हिडिओ पाठवून आजच ८३०८१२३५५५ या क्रमांकावर संपर्क साधून आपण या स्पर्धेत सहभागी व्हा.
घरगुती गौरी सजावट बक्षीसे :
प्रथम क्रमांक : एलईडी टीव्ही
द्वितीय क्रमांक : ओव्हन
तृतीय क्रमांक : फूड प्रोसेसर
चौथा क्रमांक : इंडक्शन कुकर
पाचवा क्रमांक : रोटी मेकर
घरगुती गणपती सजावट स्पर्धा बक्षिसे :
प्रथम क्रमांक : एलईडी टीव्ही
द्वितीय क्रमांक : शेगडी
तृतीय क्रमांक : कुलर
चौथा क्रमांक : होम थिएटर
पाचवा क्रमांक : मिक्सर


More Stories
पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी, सूस परिसरातील विविध विकास कामांचा भूमी पूजन सोहळा संपन्न..
महिला दिन विशेष : सोनाली प्रकाश पवार (‘रिद्धीमा ब्युटी सलोन’)
सोमेश्वरवाडी येथे नारी शक्तीवंदन आणि रॅली मध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..