पुणे:
स्त्रिया आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ज्याप्रमाणे स्त्रिया पुरुषांच्या पाठीमागे असतात त्याचप्रमाणे पुरुषांनी देखील स्त्रियांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. प्रत्येक पुरुष स्त्रीच्या पाठीमागे उभा राहिल्यास स्त्रियांना 33 टक्के आरक्षणाची गरज भासणार नाही, असे अमृता फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. स्वतःकडे लक्ष देऊन आपण सक्षम होण्यासाठी प्रयत्न करायला हवे असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
आम्ही कोथरूडकर’तर्फे आयोजित व ‘संवाद पुणे’ निर्मित कोथरूड गणेश फेस्टिव्हलमध्ये सोमवारी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘कोथरूडच्या सौभाग्यवती’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी अमृताताई देवेंद्र फडणवीस, सीमाताई रामदास आठवले, शिवसेनेच्या नेत्या दीपालीताई सय्यद आणि अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे उपस्थित होत्या. त्यांचा सत्कार सौ.मंजुश्री संदीप खर्डेकर आणि ॲड अर्चिता मंदार जोशी आणि आयोजकांनी केला. यावेळी सुषमा चोरडिया, शिलाताई गांगुर्डे, मोनिका जोशी, मंजुताई फडके, आदी उपस्थित होत्या.
कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजक, पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक मानकर, ‘संवाद पुणे’चे अध्यक्ष सुनील महाजन, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. मंदार जोशी व महाराष्ट्र प्रदेश युवा सेनेचे सचीव किरण साळी, मंजुश्री संदीप खर्डेकर आणि ॲड अर्चिता मंदार जोशी, रोटरी च्या ऋचा वझे आणि प्रिया देवधर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कोथरूड गणेश वंदना झाली. त्यानंतर फेस्टिव्हलच्या ‘श्रीं’ची आरती सौभाग्यवतीच्या हस्ते करण्यात आली.
अमृता फडणवीस म्हणाल्या, पुणे हे माझे आवडते शहर आहे. या ठिकाणी याच ठिकाणी नवीन कामाची सुरुवात होते. कोथरूड गणेश फेस्टिव्हल सुरू करून महिलांना व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.यावेळी त्यांनी ‘किसी की मुस्कुराहटो पे हो निसार….जीना इसी का नाम है’ हे गाणे सादर करून महिलांची मने जिंकली.
स्नेहल तरडे म्हणाल्या, कोथरूड गणेश फेस्टिव्हलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे.असेच या फेस्टिव्हल चे उत्तरोत्तर प्रगती होवो.
दीपाली सय्यद म्हणाल्या, कोथरूड गणेश फेस्टिव्हलमध्ये महिलांचा मानसन्मान होत आहे.पुण्याशिवाय कलाकारांना दुसरा रस्ता नाही. येथे त्यांना बळ मिळते. कलेचा सन्मान होतो. महिलांनी आपल्या आरोग्याचा विमा काढावा तसेच लक्ष द्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
सीमा आठवले म्हणाल्या, कोथरूड गणेश फेस्टिव्हलमध्ये 2 वर्षांपासून सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे, यातून चांगला संदेश देण्यात येत आहे.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी जेम्स बॉंड ००९ प्रस्तुत 5G गेम शो ‘कोथरूडच्या सौभाग्यवती’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. संदीप सुरेंद्र पाटील यांच्या बहारदार सादरीकरण यावेळी झाले. या कार्यक्रमात गाण्यांच्या भेंड्या, दोरीवरच्या उड्या कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचा महिलांनी आनंद लुटला.
More Stories
पेरिविंकल च्या सूस शाखेत महिलादिन रंगला शिक्षकांच्या स्नेहसंमेलनाने!!!….
पेरीविंकलच्या विद्यार्थ्यांची बावधन येथे भाजी मंडईला भेट..
बावधन येथे संत गाडगेबाबा महाराज जयंती निमित्त स्वच्छता बाबत जनजागृती रॅली…