May 9, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाण येथील सचिन पाषाणकर यांची भाजपा कोथरूड उत्तर मंडल (पाषाण बाणेर बालेवाडी सुस-महाळुंगे) अध्यक्ष पदी निवड..

कोथरुड :

भाजपा कोथरूड मतदारसंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आज निवडण्यात आले यामध्ये कोथरूड उत्तर मंडल (पाषाण बाणेर बालेवाडी सुस-महाळुंगे) अध्यक्ष पदी कुशल संघटक व माजी स्वीकृत नगरसेवक सचिन पाषाणकर यांची निवड करण्यात आली.

 

आज प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, यांच्या हस्ते त्यांना कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.

माझ्यावर विश्वास दाखवत पक्षाने  मला दिलेली जबाबदारी प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व पक्षातील सहकाऱ्यांना बरोबर घेत भाजपाचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आणि वाढविण्या करता अविरत प्रयत्न करत राहील : सचिन पाषाणकर अध्यक्ष कोथरूड उत्तर मंडल (पाषाण बाणेर बालेवाडी सुस-महाळुंगे)

यावेळी आ. माधुरी मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, पुणे शहर प्रभारी अमर साबळे, माजी अध्यक्ष जगदीश मुळीक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.