May 8, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल च्या सूस शाखेत महिलादिन रंगला शिक्षकांच्या स्नेहसंमेलनाने!!!….

बावधन :

शुक्रवार दि.8 मार्च चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल च्या सुस शाखेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन तर सगळेच करतात पण महिला दिनाचे औचित्य साधून वर्षभर मेहनत करत असणाऱ्या महिला शिक्षकांच्या कलगुणांना वाव मिळावा यासाठी सुस शाखेत शिक्षकांसाठी खास वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

 

कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती पूजन व दिपप्रज्वलाने करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल व संचालिका सौ. रेखा बांदल तसेच, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या समवेत समस्त पेरिविंकल चा परिवार उपस्थित होता . सर्वप्रथम शाळेच्या संचालिका सौ रेखा बांदल यांचा शाळेच्या वतीने आदर्श महिला म्हणून सत्कार करण्यात आला तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका व उपस्थित महिला यांचा देखील शाळेचे संस्थापक श्री राजेंद्र बांदल सर यांच्याकडून महिलादिनाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांच्याच सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी खास शिक्षक यांच्यासाठी स्नेहसंमेलन म्हणजेच “Annual Gathering for Teachers” आयोजित करून गाण्यांची व बहारदार परफॉर्मन्सेस ची सुरेल मैफिल आयोजित केली होती. महाशिवरात्रीच्या निमित्ताने संगीत शिक्षिका रश्मी यांनी शंभो शंकरा.. करुणा करा.. या बहारदार गाण्याने कार्यक्रमाची सुरवात करून पुढे गणेश वंदना, सत्यम शिवम सुंदरम अशा एक से बढ़कर एक हिंदी व मराठी गाण्यांचा ठेका घेत पाय थिरकत ग्रुप डान्स, सोलो डान्स, कविता, गाणी या सगळ्यांच्या सुरेल कार्यक्रमाचा मनमुराद आनंद सर्व महिलांनी मनसोक्त लुटला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी महिला दिन का साजरा करतात त्या मागचा इतिहास मोजक्या शब्दात सांगून पुराणापासून चालत आलेल्या देव देवतांपासून महिला आघाडीवरच आहेत व मुख्य खाती हे महिलांकडेच आहे असे सांगून समस्त महिलांना शुभेच्छा देऊन सर्व घर सांभाळून जबाबदारीची धुरा पेलावणाऱ्या समस्त महिलांप्रति आदर व्यक्त केला व महिला दिन हा रोजच असतो आज फक्त शुभेच्छा देण्याचा दिवस असे सांगून सगळ्या महिलांना शुभेच्छा दिल्या.

तसेच संचालिका सौ रेखा बांदल यांनी स्त्री शक्तीचा जागर व नारीशक्ती ची विविधता रूपे व वेगवेगळे पैलू अत्यंत हळुवारपणे उलगडून समस्त स्त्रीशक्तीला व आजच्या नारीला खरंच शतशः प्रणाम करून महिलांप्रति सदिच्छा व्यक्त केली. सावित्री बाई फुले व जिजाऊ यांचा आदर्श प्रत्येक स्त्री ने बाळगायलाच हवा असे सांगून महिला दिनानिमित्त सर्व शिक्षक महिलांना शुभेच्छा दिल्या.

काही शिक्षिकानी स्वतःचे मनोगत व्यक्त केले. काहींनी स्वतःमधले सुप्त गुण व कला सादर केले . लेझी डान्स, बुमरो, सत्यम शिवम सुंदरम अशा अनेक बहारदार गाण्यांवर परफॉर्मन्सेस देऊन उपस्थितांची मने जिंकली.

महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिलशिक्षकांना त्यांच्या मधील असलेल्या गुणांचा टॅग करून बॅच बहाल करून सर्व महिलांना मेडल समर्पित करून आगळा वेगळा महिलादिन साजरा करण्यात आला. सर्व महिलांच्या कलागुणांना वाव देत शुभेच्छा देऊन महिला दिनाचा कार्यक्रम शिस्तबद्ध रीतीने संपन्न झाला. शाळेतर्फे अल्पोपहराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे सर्व पुरुष शिक्षकांनी या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन केले होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली सचिन खोडके व शुभा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. सर्व महिलांनी आजचा महिला दिन कायम स्मरणात राहील असे प्रतिपादन करून शाळेचे व मुख्याध्यापिका व सर्व आयोजक यांचे मनापासून आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन HOD सचिन खोडके यांनी केले.