October 18, 2024

Samrajya Ladha

पेरीविंकलच्या विद्यार्थ्यांची बावधन येथे भाजी मंडईला भेट..

बावधन :

पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बावधन येथील पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी भाजी मंडईला भेट दिली. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांनी भाज्यांचे प्रकार व त्याची माहिती दिली. भाज्यांचे महत्त्व व त्यामधून मिळणारे घटक ही देखील माहिती त्यांनी सांगितली. बरीच मुले पालेभाज्या खात नाहीत ते खाणे किती आवश्यक आहे हे यामुळे मुलांना कळाले.

बाजार म्हणजे काय असतो, मंडईमध्ये भाज्या ग्राहकांना कशा प्रकारे विकल्या जातात, भाज्यांचे वजन कसे केले जातात, पालेभाज्या व फोडी भाज्या कशा प्रकारे मोजल्या जातात, बाजारामध्ये पैशांचा व्यवहार कशा प्रकारे केला जातो ही सगळी माहिती यामुळे विद्यार्थ्यांना मिळाली.या बाजारात पत्ताकोबी, फुलकोबी, बटाटा, भेंडी, काकडी, मुळा, पालक,मेथी या भाज्यांबरोबरच भाजी मंडईतील फळांची देखील माहिती मुलांना मिळाली.मंडईत मुलांनी खूप आनंदाने व उत्साहाने सर्व माहिती ऐकली. तुमच्या मनातील खूप प्रश्न त्यांनी त्यांच्या भाजीवाला काकांना मावशीला विचारले. मुलांचे कुतूहल आणि प्रश्न ऐकून सर्वांनाच खूप कौतुक वाटले.

पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष ज्ञानातून मुलांना लवकर गोष्टी समजतात म्हणूनच पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे अशा प्रकारचे उपक्रम वारंवार राबवले जातात.

अशा उपक्रमामुळे मुलांचे स्पर्शज्ञान बौद्धिक विकास खूप चांगल्या प्रकारे होतो. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे अध्यक्ष व संस्थापक श्री.राजेंद्र बांदल तसेच संचालिका रेखा बांदल, मुख्याध्यापिका स्वाती कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका रश्मी पाथरकर यांनी काम पाहिले.