October 9, 2024

Samrajya Ladha

बावधन येथे संत गाडगेबाबा महाराज जयंती निमित्त स्वच्छता बाबत जनजागृती रॅली…

बावधन :

कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मा.उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन श्री.संदीप कदम साहेब मा.उपायुक्त परिमंडळ क्र. ०२ श्री.संतोष वारुळे साहेब मा. महापालिका सहाय्यक आयुक्त मा.श्री.केदार वझे साहेब, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा महाराज जयंती निमित्त जनजागृती रॅली, नागरिकांना स्वच्छतेविषयी महत्व सांगून प्रबोधन करण्यात आले.

सदर कार्यक्रम बकाजी कॉर्नर ते हॉटेल डि पॅलेस पर्यंत दिनांक २३/०२/२०२४ रोजी संपन्न झाला सदर कार्यक्रमात मा.नगरसेवक श्री.दिलीपआण्णा वेडेपाटील.श्री .सुर्यकांत भुंडे, बावधन बुद्रुक आणि खुर्द मध्ये राहणाऱ्या नागरिकांचा रॅली मध्ये समावेश करून घेऊन प्रबोधन करण्यात आले. स्वच्छता विषयी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रमात स्वच्छ संस्था समन्वयक सचिन मोहिते, अजय जोयरे प्रकृती वेस्ट मॅनेजमेंट जनसुविधा फाऊंडेशन च्या श्रीमती सुवर्णा वाकणकर, चेतन दत्ताजी गायकवाड शाळेतील शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थीवर्ग, आरोग्य निरीक्षक श्री.हनुमंत चाकणकर, श्री.सचिन लोहकरे, श्री.संतोष ताटकर, श्री.लक्ष्मीकांत कुलकर्णी, श्री.सुरज पवार मोकादम राम गायकवाड, बापु वाघमारे, साईनाथ तेलंगी, वैजीनाथ गायकवाड, अशोक कांबळे, आण्णा ढावरे तसेच बावधन बुद्रुक आणि बावधन खुर्द आरोग्य कोठीकडील सेवक उपस्थित होते.