कोथरूड :
आज सुरू असलेल्या पावसामुळे कोथरूड कर्वेनगर परिसरातील प्रतिज्ञा मंगल कार्यालय जवळील अलंकार पोलीस स्टेशन पुढे मोरेश्वर, स्नेहा सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्वरित आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधून मदत कार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मनपा आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी प्रत्यक्ष भेट देत मदत कार्य सुरू केले आहे.
माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि संदीप खर्डेकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधत मदत कार्यात तत्परता दाखवली. तसेच नागरीकांना धीर देत मदत कार्य सुरू ठेवले. काही सोसायटीमध्ये कमरे एवढे पाणी होते त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाळी गटारांची योग्य ती स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. महापालिका प्रशासन या कामासाठी तत्परता दाखवत नाही. त्यामुळे नागरिकांना फार मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते.
More Stories
पेरिविंकल च्या सूस शाखेत महिलादिन रंगला शिक्षकांच्या स्नेहसंमेलनाने!!!….
पेरीविंकलच्या विद्यार्थ्यांची बावधन येथे भाजी मंडईला भेट..
बावधन येथे संत गाडगेबाबा महाराज जयंती निमित्त स्वच्छता बाबत जनजागृती रॅली…