बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरीविंकल इंग्लीश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या बावधन ,सूस ,पिरंगुट, पौड,माले व कोळवण अशा सर्व शाखांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मुलांसोबत ‘स्वच्छता अभियान’ राबवण्यात आले. या अभियानात शाळेतील विद्यार्थी, शिक्षकगण यांच्या समवेत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. प्रभात फेरीदरम्यान सामाजिक बांधिलकी जपत मुलांनी घोषवाक्ये दिली. केवळ आपले घर, शाळाच नव्हे तर आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवायला हवा हा संदेश मुलांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी ‘तंबाखू मुक्ती’ची शपथ घेतली. मुलांनी गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने भाषणे दिली.
गांधी जयंतीचे औचित्य साधून शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कष्टाची दखल घेऊन त्यांना शाल,नारळ तसेच भेटवस्तू व अल्पोपहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री..राजेंद्र बांदल व संचालिका सौ. रेखा बांदल यांनी मुलांना स्वच्छतेचे धडे दिले.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन हे सर्व शाखांचे मुख्याध्यापक सौ. निर्मल पंडित, अभिजित टकले व स्वाती कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शाखांमधील सर्व पर्यवेक्षक ,सर्व शिक्षकगण, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. सर्व स्वच्छता अभियान अत्यंत शिस्त्बद्द पद्धतीने व उत्साहाने करण्यात आले.
More Stories
पेरिविंकल च्या सूस शाखेत महिलादिन रंगला शिक्षकांच्या स्नेहसंमेलनाने!!!….
पेरीविंकलच्या विद्यार्थ्यांची बावधन येथे भाजी मंडईला भेट..
बावधन येथे संत गाडगेबाबा महाराज जयंती निमित्त स्वच्छता बाबत जनजागृती रॅली…