March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान

बावधन :

कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक १० मधील बावधन खुर्द आरोग्य कोठी आणि नव्याने समाविष्ट गाव बावधन बुद्रुक आरोग्य कोठी अंतर्गत ऍक्सीस बॅंक ते सुर्यदत्ता कॉलेज येथे स्वच्छता ही सेवा अभियान घेण्यात आले.

त्यावेळी तेथे उपस्थित बावधन खुर्द आणि नव्याने समाविष्ट बावधन आरोग्य कोठीवरील सेवक तसेच सुर्यदत्ता कॉलेज मधील विद्यार्थी, स्टाफ, सोनक टोयोटा शोरुम, बावधन सिटीझन फोरम, प्रकृती वेस्ट मॅनेजमेंट, चेतन दत्ताजी गायकवाड शाळा,जन सुविधा फाउंडेशन,माजी नगरसेवक श्री.दिलीप आण्णा वेडे पाटील, नगरसेवक श्री.किरण दगडेपाटील, मा.महा.सा. आयुक्त श्री.केदार वझे साहेब वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री राम सोनावणे साहेब, उप अभियंता श्री अमर मदिकुंट साहेब,आरोग्य निरीक्षक श्री.हनुमंत चाकणकर आरोग्य निरीक्षक श्री.सचिन लोहकरे, मोकदम बापु वाघमारे, मोकादम राम गायकवाड ,स्वच्छ संस्था, आधार पुनवाला संस्था, कॅलसॉफ्ट कंपनी सर्व शिक्षक,शिक्षका बावधन नागरिक स्वच्छता ही सेवा १ तास श्रमदान या अभियान या उपक्रमात उपस्थित होते.