March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत काढली स्वच्छ्ता रॅली…

बावधन :

कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत दि. ०२/१०/२०२३ रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत असून ०२ऑक्टोबर २०२३ रोजी वेळ सकाळी ०८:३० ते १०.०० पर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त प्रभात फेरी रॅली काढण्यात आली.

या उपक्रमा अंतर्गत मा. उप आयुक्त घनकचरा श्री संदीप कदम साहेब व श्री. संतोष वारुळे सर परिमंडळ कार्यालय क्र ०२ व मा. महा सहा आयुक्त श्री.केदार वझे साहेब आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री.राम सोनावणे साहेब यांचे मार्गदर्शना खाली प्रभाग क्र १० आणि नव्याने समाविष्ट गाव बावधन बुद्रुक येथून ‘स्वच्छता रॅली’चे नियोजन करण्यात आले.

रॅलीसाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग तसेच श्री तान्हाजी दगडे, बाळासाहेब दगडे (मा उपसरपंच), सामाजिक कार्यकर्ते अर्जुन घुले, वस्ताद दगडे आणि ग्रामस्थ बावधन बु त्याच बरोबर प्रभागातील कार्यकर्ते हे ही सहभागी झाले होते, बावधन खुर्द आणि बावधन बुद्रुक आरोग्य कोठीतील आरोग्य निरीक्षक श्री.हनुमंत चाकणकर , आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे साहेब मोकादम श्री.राम गायकवाड मोकादम बापु वाघमारे आणि बावधन बु आणि बावधन खुर्द आरोग्य कोठी कडील सर्व सफाई सेवक उपस्थित होते.*