पौड :
पेरिविंकल पौड शाखेत रक्षाबंधनाचा पारंपारिक सण उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल मॅडम, शिवानी बांदल मॅडम यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी लष्करी वेशभूषेत येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. वर्ग शिक्षकांनी भारतीय सेनेच्या कष्टमय जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले.
तसेच या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी *नारळी पौर्णिमेचे *औचित्य साधून नारळापासून वेगवेगळ्या खाद्यपदार्थ व शोभेच्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले. तसेच, मेहंदी स्पर्धा, टॅटू स्पर्धा, राखी रंगभरण स्पर्धा व राखी बनवणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या, तसेच, “नारळ एक कल्पतरू”, आणि कोळी बांधवांचे समुद्राशी असणारे अतूट नाते शिक्षकांनी समजावून दिले.
मुख्याध्यापिका वीणा कदम मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका नेत्रा काकडे, प्राजक्ता वाघवले, व इतर शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी सिमरन शेख व धनश्री जाधव यांनी केले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी