बाणेर :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी बाणेरमधील मोहननगर येथील नक्षत्र सोसायटीमध्ये आयोजित बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या परिसरातील अनेक समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, आणि कचरा व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्न होते.
या सर्व समस्यांवर समीर चांदेरे यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी, पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन त्यांनी सोसायटीच्या सदस्यांना दिले.
याप्रसंगी बोलताना समीर चांदेरे म्हणाले की, “सोसायटीमधील रहिवाशांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही नक्षत्र सोसायटीच्या समस्यांना गांभीर्याने घेतले असून, प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून यावर तातडीने उपाययोजना करू. नागरिकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या बैठकीला सोसायटीचे पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समीर चांदेरे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी