बावधन (७ ऑगस्ट २०२५) :
पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, बावधन, येथे दिनांक ७ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांचा इंवेस्टिचर समारंभ अत्यंत उत्साह आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
समारंभाची सुरुवात march past सोबत पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आली. संस्थेच्या संचालिका रेखा बांदल मॅडम आणि शिवानी बांदल मॅडम यांनी, आलेल्या पालक प्रतिनिधींसोबत दीप प्रज्वलन केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर, संस्थेच्या संचालिका सौ. रेखा बांदल मॅडम आणि कु. शिवानी बांदल मॅडम, यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदचिन्हे (badges) प्रदान करण्यात आले. स्कूल कॅप्टन, व्हाईस कॅप्टन, हाऊस लीडर्स, अनुशासन प्रमुख, हेड गर्ल, हेड बॉय, विद्यार्थी प्रतिनिधी इत्यादी विविध पदांवर विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली.
बांदल सर, रेखा बांदल मॅडम आणि शिवानी बांदल मॅडम यांनी आपल्या भाषणात नेतृत्व, जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव या मूल्यांवर भर दिला. त्यांनी नविन पदाधिकाऱ्यांना शपथ देत त्यांच्याकडून कर्तव्यनिष्ठेची अपेक्षा व्यक्त केली.
या समारंभात विद्यार्थ्यांना जबाबदाऱ्या सोपवून त्यांना नेतृत्वगुणांची जाणीव करून देण्यात आली.
या समारंभात पालक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत शाळेचे अन् विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि आनंद झळकत होता. हा समारंभ विद्यार्थ्यांना नवे प्रेरणास्थान ठरला.
शाळेचे PT शिक्षक, श्री. सूरज साठे आणि श्री. विशाल ताकमोघे यांनी विद्यार्थ्याकडून मार्चपास्ट चे उत्तमरित्या सादरीकरण करून घेतले.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि अंमलबजावणी शाळेच्या मुख्याध्यापीका सौ. शुभदा कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली, शाळा पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा जोशी, शाळा समन्वयिका सायली गायकवाड व शिरीन काझी यांनी अत्यंत नेटकेपणाने, शिस्तबद्ध व कौशल्याने पार पाडले.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन