March 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-बालेवाडी पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस आणि म्हाळुंगे भागातील नागरिकांसाठी भव्य शिवसृष्टीची मोफत सहल, ज्योती गणेश कळमकर यांचा उपक्रम..

बाणेर :

स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून पुणे शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस आणि म्हाळुंगे भागातील नागरिकांसाठी भव्य शिवसृष्टीची मोफत सहल आयोजित करण्यात आली आहे. माजी नगरसेविका सौ. ज्योती गणेश कळमकर आणि भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर यांनी या सहलीचे आयोजन केले आहे.

या सहलीबद्दल बोलताना भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर म्हणाले, “आपल्या भागातील नागरिकांना शिवकालीन वैभव आणि इतिहासाचा अनुभव आजच्या काळात घेता यावा, या उद्देशाने आम्ही या शिवसृष्टीच्या सहलीचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि पराक्रम याची आठवण करून देण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर आपण सगळे एकत्र येऊन शिवसृष्टीला भेट देऊया. ही सहल पूर्णपणे मोफत असून, सहभागी होणाऱ्या नागरिकांनी १३ ऑगस्ट, २०२५ पर्यंत आपली नावे नोंदणी करावी.”

या सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे आवाहनही कळमकर यांनी केले आहे.

 

You may have missed