बालेवाडी :
बाणेर, बालेवाडी, सुस आणि महाळुंगे परिसरातील महिलांसाठी रक्षाबंधन निमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन शिवम बालवडकर आणि त्यांच्या पत्नी व भारतीय जनता पार्टीच्या सदस्या सौ. प्रियांका शिवम बालवडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महिलांना साडी वाटपाबरोबरच केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे.
या कार्यक्रमाबद्दल बोलताना भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे शहराचे उपाध्यक्ष शिवम बालवडकर म्हणाले की, “रक्षाबंधनाच्या या पवित्र सणाच्या निमित्ताने महिला भगिनींसाठी काहीतरी खास करावे, या उद्देशाने आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात साडी वाटपाबरोबरच ‘पंतप्रधान जीवन ज्योती योजना’, ‘पंतप्रधान सुरक्षा विमा योजना’ आणि ‘अटल पेन्शन योजना’ यांसारख्या महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती दिली जाईल, जेणेकरून महिलांना या योजनांचा लाभ घेता येईल.”
हा कार्यक्रम येत्या १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत बालेवाडी येथील शिवम बालवडकर जनसंपर्क कार्यालयात होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांनी आपले आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी