बाणेर –
वामा वुमन्स क्लबच्या पुढाकाराने आणि सौ. पूनम विशाल विधाते यांच्या वतीने २३ ऑगस्ट २०२५ रोजी कुंदन मंगल कार्यालय बाणेर येथे शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याच्या काळात पर्यावरणाची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्लास्टिक आणि रासायनिक रंगांच्या गणेश मूर्तींमुळे जलप्रदूषण वाढते, जे नैसर्गिक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. ही बाब लक्षात घेऊन, मुलांना लहानपणापासूनच पर्यावरणाची जाणीव करून देणे गरजेचे आहे, असे सौ पूनम विधाते यांनी सांगितले.
याच विचारातून, २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत कुंदन मंगल कार्यालयात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत मुलांना शाडू मातीपासून स्वतःच्या हाताने गणपती बनवण्याची संधी मिळणार आहे. यामुळे मुलांमध्ये सर्जनशीलता वाढेल, तसेच त्यांना पर्यावरणस्नेही जीवनशैलीचे महत्त्व समजेल.
सौ पूनम विधाते म्हणाल्या, “गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आपण हा उत्सव पर्यावरणाची हानी न करता, नैसर्गिक पद्धतीने साजरा करू शकतो. या कार्यशाळेच्या माध्यमातून आम्ही मुलांना आणि त्यांच्या पालकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत.”
या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या मुलांचा सहभाग नोंदवण्यासाठी, पालकांनी https://forms.gle/xxDzkPT8hiyPMKxy6 या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी, असे आवाहन पूनम विधाते यांनी केले आहे. या उपक्रमातून तयार होणारे पर्यावरणपूरक गणपती आपल्या घरी विराजमान करून, एक सकारात्मक बदल घडवण्याचे आवाहन सौ पूनम विधाते यांनी केले आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी