August 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीतील अटलांटिस सोसायटीच्या समस्यांवर शिवम बालवडकर यांची चर्चा..

बालेवाडी :

भारतीय जनता पार्टी पुणे शहर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवम बालवडकर आणि प्रियंका शिवम बालवडकर यांनी आज बालेवाडी येथील अटलांटिस सोसायटीमध्ये रहिवाशांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर मोकळेपणाने चर्चा झाली.

 

यावेळी सोसायटी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, कचरा संकलन व साफसफाईची समस्या, रात्रीच्या वेळी सुरक्षेचा अभाव, बंद पडलेले पथदिवे आणि पावसाळ्यात विविध ठिकाणी साचणारे पाणी या प्रमुख समस्या रहिवाशांनी मांडल्या. या सर्व समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन शिवम बालवडकर यांनी दिले. तसेच, संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या समस्या त्वरित सोडवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती, चिन्हांकित पार्किंग क्षेत्र निर्माण करणे, पथदिव्यांची दुरुस्ती, ड्रेनेज नेटवर्क मजबूत करणे, अवैध अतिक्रमणे हटवणे आणि परिसरात नियमित स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी कचरा संकलन यासारख्या ठोस उपाययोजनांवर यावेळी चर्चा झाली.

पुढील कार्यवाहीसाठी तातडीने अधिकाऱ्यांना सूचना देणे, ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करणे, पोलिसांकडून पेट्रोलिंग वाढवणे आणि जनसंपर्क कार्यालयामार्फत सतत निगराणी ठेवणे अशी योजना आखण्यात आली आहे.

शिवम बालवडकर यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला अटलांटिस सोसायटीतील रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मतही बालवडकर यांनी व्यक्त केले.