बाणेर :
बाणेर-बालेवाडी परिसरात प्रतीक्षित अग्निशमन केंद्र अखेर सुरू झाले आहे. २०१५ पासून माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अथक प्रयत्नांना हे यश मिळाले आहे. या केंद्राची आज बालवडकर यांनी पाहणी केली.
बाणेर-बालेवाडी अग्निशमन केंद्र कार्यान्वित
बाणेर आणि बालेवाडी परिसरातील वाढती लोकसंख्या, गगनचुंबी इमारती आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता, येथे अग्निशमन केंद्राची नितांत गरज होती. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची मानली जात होती.
दीर्घकालीन संघर्ष आणि प्रशासकीय पूर्तता
या अग्निशमन केंद्राच्या उभारणीचा लढा २०१५ मध्ये ‘संघर्ष यात्रे’द्वारे सुरू करण्यात आला होता. २०१८-१९ मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आणि दीड वर्षांपूर्वीच हे काम पूर्ण झाले होते. मात्र, प्रशासकीय पातळीवरील विलंबामुळे हे केंद्र कार्यान्वित होण्यास उशीर झाला. अखेरीस, २४ डिसेंबर २०२४ रोजी अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन हे अग्निशमन केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर संबंधित विभागांनी त्वरित कार्यवाही करत हे केंद्र सुरू केले.
अत्याधुनिक सुविधांसह सज्ज
या अग्निशमन केंद्रात अत्याधुनिक अशा उंच शिडीच्या दोन अग्निशामक गाड्या (फायर व्हेईकल्स) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, अधिकारी आणि कर्मचारी वर्गही पूर्ण क्षमतेने तैनात करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत पोहोचवणे शक्य होणार आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा भक्कम आधार
माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, “ही केवळ एक सेवा सुविधा नाही, तर बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा एक मजबूत आधार आहे. हा लढा, ही यशोगाथा म्हणजे संघर्ष यात्रा, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने साधलेले सामूहिक यश आहे.”
आज बाणेर अग्निशमन केंद्राला दिलेल्या भेटीप्रसंगी केंद्रप्रमुख श्री. शिवाजी मेमाणे, प्रभारी अधिकारी श्री. प्रमोद मरळ, तांडेल श्री. गणेश शिंदे, फायरमन सागर ठोंबरे, महेश गारगोटे, ज्ञानेश्वर गायकवाड, अजित बिचकुले, ऋषिकेश जरे, विशाल गेंगजे, प्रणित ईलपाते, सुमित गाजरे, अक्षय गायकवाड, राजन भालचिम, श्रीजीत सस्कर, आकाश मेंगडे आदी उपस्थित होते.




More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी