पिरंगुट :
पिरंगुट येथील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षकांसाठी एका विशेष आत्मसंरक्षण प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात शिक्षकांना संभाव्य धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत तंत्रे शिकवण्यात आली.
शारीरिक शिक्षण शिक्षक आकांक्षा पाटील आणि प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. शाळेच्या प्राचार्या आसावरी हंचाटे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला. त्यांना माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार आणि पूर्व-प्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या प्रशिक्षण सत्रात शिक्षकांनी आत्मसंरक्षणाची विविध तंत्रे शिकून घेतली. कठीण प्रसंगांमध्ये शांत राहून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आले. सर्व शिक्षकांनी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेतला आणि या प्रशिक्षणाचे मनापासून कौतुक केले.
या कार्यशाळेमुळे शिक्षकांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली आहे. पेरिविंकल शाळा केवळ शैक्षणिक प्रगतीवरच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासावरही भर देते, हे या उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी