March 22, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील कोस्टा ब्लांका सोसायटीच्या समस्या सोडवण्यासाठी समीर चांदेरे यांची विशेष बैठक संपन्न..

बाणेर, ५ जुलै:

माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर येथील कोस्टा ब्लांका सहकारी गृहनिर्माण संस्थेत एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. यावेळी समीर चांदेरे उपस्थित होते. या बैठकीत रहिवाशांच्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आणि त्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

सोसायटीवर लागू करण्यात आलेल्या ४०% करासंदर्भात बैठकीत महत्त्वाचा विचारविनिमय झाला. कर रचनेत अधिक पारदर्शकता आणणे आणि नागरिकांवरील आर्थिक भार कमी करण्यावर सदस्यांनी भर दिला, तसेच यासंदर्भात कायदेशीर पाऊले उचलण्याचेही ठरले.

याशिवाय, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती, पथदिवे, सुरक्षितता, कचरा व्यवस्थापन, पार्किंग सुविधा यांसारख्या मूलभूत गरजांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या समस्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना आखण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्थानिक प्रशासनासोबत प्रभावी समन्वय साधून प्रलंबित कामांना गती देणे आणि पुढील नियोजन प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवणे यावरही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या निर्णयामुळे रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरच मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे

या बैठकीबद्दल बोलताना समीर चांदेरे म्हणाले, “बाणेर येथील कोस्टा ब्लांका सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर एकत्रितपणे तोडगा काढणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. ४०% कराचा मुद्दा असो किंवा पाणीपुरवठा, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत गरजा असोत, आम्ही सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा केली आहे. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग घेऊन माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व समस्यांवर तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करण्याचा आमचा मानस आहे.”