August 27, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे डॉक्टर डे निमित्त सौ. पुनम विधाते यांच्या पुढाकाराने महिला डॉक्टरांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न…

बाणेर:

आरोग्यसेवेत योगदान देणाऱ्या महिला डॉक्टरांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने वामा वुमन्स क्लबच्या वतीने सौ. पुनम विशाल विधाते यांच्या पुढाकाराने डॉक्टर डे निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

या कार्यक्रमात बाणेर, बालेवाडी सुस महाळुंगे परिसरातील विविध वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नीता चिटणीस, डॉ. प्रिया देशपांडे, डॉ. कविता चौधरी (अध्यक्ष – बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन), डॉ. स्वाती बधिये, डॉ. अमरजी, डॉ. मनीषा डोईफोडे, डॉ. तेजस्विनी भाले आणि डॉ. अनुजा डोके यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभिज्ञा येवले, सौ. शोभा श्रीकांत यांनी उत्साही पद्धतीने पार पाडले. आयोजनात डॉ तेजस्विनी भाले यांचे विशेष योगदान लाभले.

सौ. पूनम विधाते यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महिला डॉक्टर हे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेतील आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.”

या कार्यक्रमातून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत महिलांचा उत्साहवर्धन आणि सामाजिक सहभाग वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.