September 23, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील ॲड. आशिष अर्जुन ताम्हाणे यांची महाराष्ट्र आणि गोवा नोटरीज असोसिएशनच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड..

पुणे, 6 जुलै 2025:

महाराष्ट्र आणि गोवा नोटरीज असोसिएशनने नुकतीच बाणेर येथील श्री. आशिष अर्जुन ताम्हाणे यांची पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. ताम्हाणे हे एक प्रख्यात वकील आणि नोटरी असून, त्यांची ही निवड असोसिएशनच्या सदस्यांनी एकमताने केली आहे.

 

महाराष्ट्र आणि गोव्यामधील नोटरींच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या या असोसिएशनने, श्री. ताम्हाणे यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा फायदा घेण्यासाठी त्यांची निवड केली आहे. असोसिएशनने त्यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला असून, त्यांच्या मौल्यवान सहकार्याची आणि मार्गदर्शनाची अपेक्षा केली आहे.