बालेवाडी , ६ जुलै २०२५ –
बालेवाडी येथील ए.एन.पी. अटलांटिस सोसायटीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहराचे उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांच्या वतीने नागरिक सुविधा केंद्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला सोसायटीमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या केंद्रात नागरिकांनी खालील अनेक सुविधांचा लाभ घेतला:
* आधार कार्ड अपडेट
* नवीन पॅनकार्ड
* नवीन मतदान नोंदणी
* रेशनकार्ड
* मॅरेज सर्टिफिकेट (विवाह प्रमाणपत्र)
* भाडेकरू करार
* पासपोर्ट सुविधा
* रहिवासी दाखला
आणि इतर अनेक आवश्यक सेवांचा नागरिकांना लाभ घेता आला.
यावेळी बोलताना शिवम बालवडकर म्हणाले, “नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांचा उत्साही सहभाग हे समाजात अशा उपक्रमांची किती गरज आहे, हेच दाखवून देतो. नागरिकांना या सेवा सोयीस्करपणे मिळाव्यात यासाठी आम्ही असे प्रयत्न सुरू ठेवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी