बाणेर :
बाणेर येथील वॉटर एज सोसायटीमधील रहिवाशांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी नुकतीच एक बैठक घेतली.
या बैठकीत नागरिकांनी त्यांच्या पाणी, रस्ते, स्वच्छता अशा अनेक नागरी समस्या मांडल्या.
माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या मदतीने या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील, असे आश्वासन समीर चांदेरे यांनी यावेळी वॉटर एज सोसायटीमधील रहिवाशांना दिले.
समीर चांदेरे हे सातत्याने सोसायटीमधील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या समस्या हक्काने मांडत आहेत. यामुळे दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून येत आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!