पुणे :
पुणे महानगरपालिकेने बालेवाडी-जगताप डेअरीला जोडणाऱ्या रस्त्याचे काम या आठवड्यात सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे महानगरपालिकेत सिटी इंजिनियर प्रशांत वाघमारे, अनिरुद्ध पावसकर आणि महानगरपालिकेच्या रस्ते विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत भाजपा युवा मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांनी या रस्त्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांनी वाघमारे यांना निवेदन सादर केले. प्रशांत वाघमारे यांनी या आठवड्यात रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.
“गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना जो त्रास होत होता तो लवकरच संपेल असा माझा विश्वास आहे,” असे शिवम बालवडकर यांनी सांगितले.
यावेळी शिवम बालवडकर यांनी ज्या शेतकरी आणि स्थानिक नागरिकांची जागा रस्त्याच्या कामात जात आहे, त्यांचे वाघमारे यांच्याशी संभाषण घडवून आणले. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होऊन रस्ता पूर्ण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले गेल्याचे बालवडकर यांनी नमूद केले.
पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून हा रस्ता पूर्ण होणार आहे. बाणेर आणि बालेवाडी येथील नागरिकांची ही एक मोठी मागणी यामुळे पूर्ण होणार आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी