महाळूंगे :
पुणे महानगरपालिका, आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिला कार्यध्यक्ष आणि पूनम विशाल विधाते यांच्या प्रयत्नांतून आज महाळुंगे गावात महिलांसाठी शिवण क्लासचा शुभारंभ करण्यात आला. ‘महिलांच्या हातात सुई-धागा नव्हे, तर स्वाभिमानाचे शस्त्र!’ या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन करताना पूनम विशाल विधाते म्हणाल्या, “हा उपक्रम केवळ शिवणकामाचे प्रशिक्षण नसून, तो स्वावलंबन, आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वासाचा आरंभ आहे.” महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर कुटुंब, समाज आणि देशही सक्षम होतो, या विचारावर त्यांनी भर दिला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हा एक नवा अध्याय सुरू झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या शिवण क्लासमुळे महाळुंगे गावातील महिलांना नवीन कौशल्ये शिकण्याची, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याची संधी मिळणार आहे. यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील अशी अपेक्षा आहे.





























More Stories
तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पेरिविंकल पौडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार
“तायक्वांदोच्या मैदानात पेरिविंकलचा दबदबा; १६ पदकांची शानदार कमाई!”