November 21, 2024

Samrajya Ladha

बाणेरच्याच माजी नगरसेविकेला लागली पुणे मनपाची मिळकत कर लॉटरी..

पुणे :

पुणे महानगरपालिकेने नागरिकांनी संपूर्ण मिळकत कर भरणाऱ्यांसाठी लॉटरी जिंकण्याची संधी दिली होती या योजनेमुळे जवळपास 1300 कोटी रुपयाची मिळकतकर वसूल झाली. पुणे महापालिकेने राबविलेल्या’प्रोत्साहन योजने’त सात लाखांहून अधिक नागरिकांमधून मिळकत कर भरणाऱ्यांच्या लॉटरीमध्ये बाणेर येथील माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर आणि गणेश ज्ञानोबा कळमकर या दाम्पत्याला एक लाखापेक्षा जास्त कर भरणाऱ्या विभागात प्रथम क्रमांकाचे पेट्रोल कार बक्षीस लॉटरी सोडत दरम्यान प्राप्त झाले.

महापालिकेने मिळकत कराचे बिल भरण्याची ३१ मुदत जुलैपर्यंत वाढविली होती. या मुदतीत सात लाख ६२ हजार ५३९ नागरिकांनी बिलाचा भरणा केला होता. त्यातून माजी नगरसेविका ज्योती कळमकर व गणेश कळमकर यांच्या नावाची चिठ्ठी सोडतीत निघाली. त्यांच्यासह चार पुणेकर नशीबवान ठरले आहेत.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते ऑनलाईन लॉटरीची सोडत काढण्यात आली. विविध स्तरावरील विजेत्यांची नावे घोषित केली गेली. पुणे महानगरपालिकेने मिळकत कर भरला जावा म्हणून प्रोत्साहन पर लॉटरी सोडत योजना राबवली होती.

यावेळी, मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. विक्रम कुमार, मा. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, श्री. विकास ढाकणे, मा. विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी, आदी उपस्थित होते.