May 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष पदी समीर चांदेरे यांची निवड..

बाणेर :

पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी युवा नेते समीर बाबुराव चांदेरे यांची एकमताने निवड झाली. युवकांशी असणारा संपर्क आणि मनमिळावू व्यक्तिमत्व असणाऱ्या तरुण तडफदार व्यक्तिमत्वाची निवड राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहरांमध्ये बळकटी निर्माण करेल.

 

समीर चांदेरे यांचे संघटन कौशल्य, काम करण्याची हातोटी, समस्यांची जाण आणि त्या सोडविण्यासाठी करत असणारी प्रयत्नाची पराकाष्ठा ह्या सर्वांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखी बळकट होण्यास मदत होणार आहे. त्यांच्या निवडीने युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सर्व स्तरातून त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे.