October 9, 2024

Samrajya Ladha

मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा; आपची मागणी

पुणे :

पुणे शहराची जीवनदायीनी असलेल्या मुळा मुठा नदीची प्रदूषणामुळे जी दुरावस्था झाली आहे. त्याची आम आदमी पक्षाच्या वतीने दोन दिवसापूर्वी पाहणी करण्यात आली होती. तसेच पाहणी करते वेळी आम आदमी पक्षाच्या वतीने नदीचे पाणी बाटल्यांमध्ये भरून ते पुणे महानगरपालिका आयुक्त, पुण्याचे पालकमंत्री, जलसंपदा मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देण्यासाठी घेतले होते. मंगळवारी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गेले असता त्यावेळी त्यांची आयुक्तांशी भेट होऊ न शकल्याने, आज गुरुवारी पुन्हा पदाधिकारी व कार्यकर्ते आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले होते.

पक्षाच्यावतीने गुरुवारी आम आदमी पक्षाचे दहा ते पंधरा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिष्ट मंडळ हे आयुक्तांची भेट घेणार असून त्याबाबतची परवानगी द्यावी अशी मागणी मंगळवारच्या भेटीदरम्यान केली गेली होती. ही मागणी मंगळवारी मान्य केलेली असल्यामुळे आज कार्यकर्ते पुणे महापालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना सुरक्षारक्षकांनी पुन्हा अडवले व तुम्ही इतके जण आत जाऊ शकणार नाहीत असे सांगितले. अशाप्रकारे कार्यकर्त्यांची अडवणूक केली गेल्याने पक्षाचे कार्यकर्ते व सुरक्षारक्षक यांच्यात वाद झाले. तसेच सुरक्षारक्षकांनी कार्यकर्त्यांना तुम्हाला पक्षाची टोपी घालून आत जाता येणार नाही, असे सांगून अडवण्याचा प्रयत्न केला असता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या गोष्टीला कडाडून विरोध करत शेवटी पक्षाची टोपी घालूनच महापालिकेत प्रवेश केला.

आयुक्तांशी झालेल्या भेटीत आत्तापर्यंत मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाबाबत, जयका प्रकल्प बाबत श्वेत पत्रिका काढावी तसेच येत्या सात दिवसात पत्रकार परिषद घेऊन नदी सुधार प्रकल्पाबाबत ची माहिती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी केली.

राम नदी बाबत अनेक तक्रारी, पाठपुरावा केला, वेळ पडली म्हणून MPCB आणि NGT यांना तक्रार केली. एकंदरीतच पुणे महानगरपलिकेने खोटे पुरावे, दस्तावेज NGT मध्ये सादर केल्याचे उघड झाले आहे. इतके असूनही आम्ही पालिकेला सहकार्य करून नद्या स्वच्छ करणार आहोतच. असे कुणाल घारे यांनी सांगितले.

महापालिका आयुक्तांच्या वतीने आम आदमी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना सकारात्मकतेने घेण्यात आले असून, आम आदमी पक्षाने उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी मीटिंग घेण्याचे आश्वासन दिले आहे असे कृणाल घारे यांनी सांगितले.

आम आदमी पक्षाच्या वतीने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

आम आदमी पक्ष चे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, महासचिव सतीश यादव, अक्षय शिंदे, कुणाल घारे, सचिव अमोल मोरे, प्रभाकर कोंढाळकर, शिक्षक आघाडी अध्यक्ष शीतलताई कांडेलकर, शंकर थोरात, कुमार धोंगडे, सुनील भोसले, किरण कांबळे, उमेश बागडे, आसिफ मोमीन, अविनाश भाकरे, गणेश थरकुडे, हृषिकेश मारणे उपस्थित होते.

You may have missed