June 25, 2024

Samrajya Ladha

माजी महापौर मुरलीधर मोहोळ भाजपचे पुणे लोकसभा उमेदवार…

पुणे :

भारतीय जनता पार्टीकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली नव्हती. परंतू आता दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये सस्पेन्स असलेल्या पुणे लोकसभेच्या जागेवर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपतर्फे राज्यसभेचे माजी खासदार संजय नाना काकडे, माजी आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील देवधर यांचे नावे चर्चेत होती. मात्र, या सर्वात आघाडीवर मोहोळ यांचे नाव चर्चेत होते. मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात चांगले काम केले होते. त्याची वरिष्ठ पातळीवर दाखल घेण्यात आली होती. अखेर भाजपने त्यांना संधी दिली. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा निवडणूक होणार आहे. सलग दोन लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार जिंकून आल्याने मुरलीधर मोहोळ हॅट्रिक करणार का? हे येणारा काळ ठरवेल.

उद्या सकाळी अकरा वाजता पुण्यनगरीचे ग्रामदैवत कसबा गणपती चे दर्शन घेऊन महायुती चे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधरजी मोहोळ यांची भव्य अभिवादन फेरी निघणार आहे.

भाजपाचे महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवार ;
1. नंदुरबार – हिना गावित
2. धुळे – सुभाष भामरे
3. जळगाव – स्मिता वाघ
4. रावेर – रक्षा खडसे
5. अकोला – अनुप धोत्रे
6. वर्धा – रामदास तडस
7. नागपूर – नितीन गडकरी
8. चंद्रपूर – सुधीर मनगंटीवार
9. नांदेड – प्रतापराव चिखलीकर
10. जालना – रावसाहेब दानवे
11. दिंडोरी – भारती पवार
12. भिवंडी – कपिल पाटील
13. मुंबई उत्तर – पियुष गोयल
14. मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा
15. पुणे – मुरलीधर मोहळ
16. अहमदनगर – सुजय विखे पाटील
17. लातूर – सुधाकर सुंगारे
18. बीड – पंकजा मुंडे
19. माढा – रणजित नाईक निंबाळकर
20. सांगली – संजय काका पाटी