पुणे :
पुणे शहरातील पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या दालनाबाहेर विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जवळपास तासभर ठिय्या आंदोलन केले.
यावेळी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, पुण्येश्वर मंदिर समस्त पुणेकरांसाठी पवित्र स्थान आहे अशा वेळी मंदिराच्या परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्यात यावे. या मागणीसाठी आजपर्यंत प्रशासनासोबत अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन करीत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाची दखल प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा आम्ही भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
यावेळी आयुक्त आज पालिकेत उपस्थित नसल्याने भेट होऊ शकली नाही. आंदोलन दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, माजी स्थायी समिती चेअरमन हेमंत रासने,पतित पावन संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल नाईक, महेश पवळे, सचिन दळवी यांच्यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
More Stories
माजी महापौर मुरलीधर मोहोळ भाजपचे पुणे लोकसभा उमेदवार…
क्रेडाई महाराष्ट्राचे प्रथमच व्हिएतनाम येथे आंतराराष्ट्रीय अधिवेशन संपन्न…
मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा; आपची मागणी