December 3, 2024

Samrajya Ladha

वडिलांच्या स्मरणार्थ राजेंद्र बांदल यांच्याकडून देहु, भुकूममधील देवस्थानला 30 लाखांची देणगी, पंढरपूरमधील धर्मशाळेलाही मदत..

बावधनः

स्वर्गिय वडिल भगवान गणपत बांदल यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने त्याच्या स्मरणार्थ लोकेनेते राजेंद्र बांदल यांनी देहूजवळील भंडारा देवस्थानला संत तुकाराम मंदिराकरीता 25 लाख तर भुकूममधील रामेश्वर मंदिरासाठी 5 लाखांची देणगी देत आपल्या दातृत्वाचे आज दर्शन घडवले.

बावधन येथील स्मशान भूमीत 105 व्या वर्षी देवाज्ञा झालेल्या भगवान गणपत बांदल यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पाडला. याप्रसंगी एक वडिल जे जे करीता या अभंगावर भाषाप्रभू हभप पंकज महाराज गावडे यांचे सुश्राव्य प्रवचन झाले. यानंतर माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शरद ढमाले व जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या हस्ते भंडारा डोंगर समितीच्या वतीने हभप पंकज महाराज गावडे यांनी 25 लाखांचा धनादेश देणगीचा स्वीकार केला.

या प्रसंगी पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब चांदेरे,  पुणे शहर राष्ट्रवावादीचे अध्यक्ष दिपक मानकर, भाजपाचे पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, माजी गटनेते शांताराम इंगवले, पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, राष्ट्रवादीचे राजाभाऊ हगवणे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक दिलीप दगडे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेवक मनोहर पवार, हभप वसंत कलाटे, मा. सभापती कोमल वाशिवले, नगरसेवक किरण दगडे, अल्पना वर्पे यांच्यासह मोठया संख्येने सरपंच, उपसरपंच, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, शासकीयपदाधिकारी व जनसमूदाय उपस्थित होता.

भारताच्या परतंत्र्यकाळात जन्मलेले 105 वर्षांच्या राजेंद्र बांदल यांच्या वडिलांनी आधुनिक युगही अनुभवले असे सांगून हभप पंकज महाराज गावडे आपल्या प्रवचनात म्हणाले की ही पांढरी टोपी घालणारी खरी पिढी होती. या पिढीनेच संस्कृती, परंपरा जतन करून ठेवल्या. आज मोबाईलच्या जमान्यात पंचाताराकित वृध्दाश्रम उभी राहत आहे. याच काळात भगवान बांदल यांच्यासारखी माणसे आदर्शच आहेत. यानंतर बाळासाहेब चांदेरे, मंगलदास बांदल, लेखक, पत्रकार संजय दुधाणे, पत्रकार विनोद माझिरे यांनी श्रध्दांजली अर्पित केली.

वडिलांच्या दशक्रियानिमित्त राजेंद्र बांदल यांच्याकडून 26 लाखांपेक्षा अधिक देणगी विविध धार्मिक संस्था, देवस्थानला देण्यात आली. पंढरपूर येथील मुळशी तालुक्यासाठी असणारी धर्मशाळा व जन्मभूमी बावधनमधील गणेश मंदिरालाही बांदल परिवाराकडून देणगी देण्यात आली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रामचे सूत्रासंचालन टिव्ही 9 चे पत्रकार संजय दुधाणे यांनी केले.

स्वर्गिय वडिल भगवान गणपत बांदल स्मरणार्थ माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या हस्ते 25 लाखांच्या देणगीचा स्वीकार करताना हभप पंकज महाराज गावडे, शेजारी सुनील चांदेरे, राजाभाऊ हगवणे, मंगलदास बांदल, शंकर मांडेकर, शरद ढमाले व शांताराम इंगवले